प्राचार्य . श्रीकांत सोनवणे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ, चुंचाळे , नाशिक येथे सहलीचा लाभ मिळाला आणि सरांनी मला छायाचित्रणा साठी बोलवून येथे छायाचित्रण करण्याची संधी उपलब्ध करून दिली , छायाचित्र काढत असतानाच एक वेगळा अनुभव पांजरापोळ, नाशिक येथे आला ..
चुंचाळे येथील पांजरापोळच्या ७५० एकरवरील निसर्गाची सफर केली, ही ना विसरणारी सफर आहे. झाडे, वेली, पशु- पक्षी, सेंद्रिय शेतीसह जैवविविधता पाहून सर्वांचीच मनं आनंदी झाली.....
शांत वातावरणातला पक्ष्यांचा किलबिलाट हा लहानपणापासून कुठे दूर गेला होता आणि तो पांजरापोळ नाशिक येथील सहलीच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाला .....
संत ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी मधील -
" ते असे- पै पारिवा जैसा किरीटी | चढला नभाचिये पाठी । पारवी देखोनिया लोटी | आंगचि सगळे ||
तसेच संत तुकाराम महाराजांचा अभंग -
'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी | पक्षीही सुस्वरे आळविती ||
याची प्रत्यक्ष प्रचिती येथे आले आणि निसर्ग रूप पांडुरंग यांचे दर्शन येथे झाले .
डॉ. झामरे आणि पांजरापोळ, नाशिक व्यवस्थापक श्री. विठ्ठल आगळे यांनी पांजरापोळमधील जैवविविधतेची माहिती दिली.
त्यानंतर सुरू झाली दोन ट्रॅक्टरद्वारे शिवाराची सफर ... उन्हाची दाहकता असूनही सुद्धा ही ट्रॅक्टरची सफर चा अनुभव हा मजेशीर होता ...
डॉक्टर झामरे यांनी पांजरापोळ मध्ये गीर, डांगी, पुंगुनूरू आदी देशी गायींचे संगोपन येथे केले जाते , यात अनेक वृद्ध, अनुत्पादक, दिव्यांग, अशा १३०० हून अधिक गायींची आयुष्यभरासाठी घेतली जाणारी काळजी कशी घेतली जाते ते समजावून सांगितले आणि ते ऐकून बघून सर्वचजण गोशाळा व्यवस्थापना चे कौतुक करावे तेवढे कमीच .....
सभा मंडपात पांजरापोळ ,नाशिक येथील सदस्यांच्या मार्फत जी जलसंवर्धन यांबद्दल माहिती दिली गेली होती ती प्रत्यक्ष ट्रॅक्टर सफारीतून पाहताना आश्चर्य व्हावे असेच होते . या परिसरातील २६ जलसंवर्धन तळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.
ज्यात कोट्यवधी लिटर पाण्याचे संवर्धन केले जाते. तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत कमीत कमी चार फूट पाणी शिल्लक राहते. पाणी नियोजनासाठी 'तुषार' व 'ठिबक' सिंचन या परिणामकारण पद्धतीचा अवलंब सुखावणारा ठरला. चोख पाणी नियोजनामुळे परिसरातील तलावांमध्ये बदके, राजहंस व तलावातील माशांचे संवर्धन केले जाते. पांजरापोळ नाशिक येथे सुमारे ३५० पेक्षा जास्त प्रजातींची लाखांहून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यात अनमोल अशा औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
पुढचे मार्गदर्शन पाणी आडवा आणि पाणी जिरवा याबद्दल झाले डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविणे, पाणथळ भागातील पाणी वाहून नेण्यासाठी या चाऱ्यांचा उपयोग कसा केला जातो याबद्दलही प्राचार्य. श्रीकांत सोनवणे आणि डॉक्टर झांमरे यांनी माहिती दिली.
३ फूट रुंद, सरासरी ५ फूट खोल अशी एकूण सुमारे ४० हजार फूट लांबीच्या चाय खोदल्या आहेत ते सहलीच्या दरम्यान सांगितले या चाऱ्या जमिनीत पाणी जिरवून जास्तीचे पाणी आपल्या जलसंवर्धन तळ्याकडे नेले जाते , त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा आजूबाजूच्या सर्वच शेतकऱ्यांना झाला आहे , हे ऐकून नाशिकच्या या ऑक्सिजन फॅक्टरीमध्ये निसर्गाचा किती उपयोग केला जातो आणि त्याची निगा कशी राखली जाते याची प्रचिती आली ....
पुढची माहिती ही मधुमक्षिका पालन याबद्दल देण्यात आली मधमाशी पेट्यांच्या सहाय्याने हा प्रकल्प मध गोळा करून विकण्यासाठी नव्हे, तर परागीभवनासाठी चालवला जातो हे सांगितले गेले .. पांजरपोळच्या क्षेत्रातील सूर्यफुल सौंदर्यात भरच घालत नाहीत, तर मधमाशांसाठी परागकण गोळा करण्यास उपयुक्त ठरतात. ज्यामुळे परागीकरणासच चालना मिळते. मोर, पोपट व इतर पक्षी सूर्यफुलाच्या बिया खाण्यासाठी येतात, त्यामुळे एकप्रकारे बर्ड हाऊस तयार झाले १४० पक्षांची पक्षी निवारे या क्षेत्रात तयार झाली आहेत .
त्याचबरोबर गांडूळखत प्रकल्प, अंतर्गत नर्सरी, मुरघास खड्डे, सौरविद्युत प्रकल्प, पथदीवे, अंतर्गत जलस्रोत, शेण, गोमूत्र, चारा आदी सर्व नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून तयार करण्यात आलेला नैसर्गिक खत प्रकल्प हा दाखवण्यात आला .
येथील तयार झालेले पौष्टिक अन्न हे जनावरांना देऊन उच्च प्रतीचे प्रमाणित सेंद्रिय गाईचे दूध, तूप तयार करण्यास मदत होते .
यासोबतच आंबा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच आणि इतर हंगामी फळे, भाज्या येथे वर्षभर उपलब्ध असतात आणि ते विक्रीसाठी बाहेरही दिले जातात हे सांगितले गेले .. इतका मोठा नैसर्गिक खजिना नाशिक सारख्या शहरात असेल असा विचारही कधी केला नव्हता.
ट्रॅक्टर सफारीत पुढचा टप्पा होता तो म्हणजे नाशिकच्या ऑक्सिजन फॅक्टरी मधला मीटिंग पॉइंट
...
ह्या मिटिंग पॉईंटवर बोगनवेल, इतर फुलझाडे व वृक्षलागवड करून खूप छान प्रकारे सुशोभीकरण केले आहे, आणि विशेष म्हणजे नाशिक पांजरपोळ येथून निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक साधनांपासून बनविलेली एक मोठी झोपडी आहे. हा एक मोठा सभा मंडप म्हणावा , इथे उन्हाचा क्षीण हा लयास मिळाला कारण जमीन ही शेणाने सावरली होती , थोडी ओलीच होती त्यामुळे येणारा मातीचा सुगंध हा मनाला शांतता देणारा होता , या जागे वर एक फोटो पॉईंट सुद्धा आहे. येथे धान्य व पाणी ठेवल्यास सकाळी मोर, पोपट व इतर पक्षी येतात , आणि त्यांची सभा येथे भरली जाते असे सांगितले गेले , २०० हून अधिक मोरांचा वावर जिथे आहे हे समजल्यावर तर उत्सुकता शिगेला होती मोर बघण्याची , पूर्ण २०० नाही पण जे एक-दोन मोर दिसले , ते दृश्य डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला.
ट्रॅक्टर सफारी नंतर सहलीच्या शेवटचा टप्पा हा अल्पउपहाराने झाला . निरोप समारंभाच्या वेळी पांजरापोळ, नाशिक येथील सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी केलेल् आदरातिथ्य कौतुकास्पद होत .. या सहलीमध्ये मला छायाचित्रणा ला बोलवून संधी दिली आणि मला पांजरपोळा नाशिक हे बघायला मिळाले आणि अनुभवायला मिळाले ते फक्त प्राचार्य. श्रीकांत सोनवणे यांच्यामुळेच ...
माझ्या जन्मापासून नाशिक मध्ये पहिल्यांदा शुद्ध ऑक्सिजन हे फुफ्फुसात गेल्याचा अनुभव मी तरी अनुभवला पांजरापोळ, नाशिक येथेच ....
लेखक : मंगेश मीनासाहेब एस .
सर्व छायाचित्रे : मंगेश मीनासाहेब एस .
+91 8806674257