प्रिय जनांनो ,
आज काल आयुष्यात काय चाललंय हे काही सध्या समजतचं नाहीये ???
असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाच असेल. कधी स्वसंवाद साधताना तर कधी मित्रांसमोर मन मोकळं करते वेळी , साहजिकच आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक घडीवर..... अशावेळेस साथ देते फक्त आपले मन आणि आपले विचार... फक्त सकारत्मक विचार कमी पडता का हो... तर नाही त्या विचारांची कृती ती सकारात्मकता प्रत्यक्ष अस्तित्वात आणते.
" चांगला विचार + चांगली कृती + चांगला असलेला स्वतः वरचा विश्वास = यशस्वी आणि तणावमुक्त आयुष्य "
हे समीकरण आयुष्याची बांधून घ्यायला हरकत नाही.
नैराश्य आणि दुःख या गोष्टी आयुष्याच्या वाजबाकीत जमा कराव्यात आणि सांगड घालावी ती फक्त सकारत्मक विचारांच्या गुणाकाराची.....
आयुष्य सुंदर आहे जगून पहा , एकदा स्वतःशीच हसून पहा , आपण इतरांना ओळखतो पण एकदा स्वतःला ओळखून पहा, विश्वास ठेवा स्वतःवर पावलोपावली .... आणि जगा एक परिपूर्ण आणि स्वछंद श्वासांचे आनंदमयी आयुष्य.....
: मंगेश साहेबराव सोनवणे.
८८०६६७४२५७
This comment has been removed by the author.
ReplyDelete